आतातरी कामाला सलाम ठोकाचं !

आतातरी कामाला सलाम ठोकाचं !

आहे त्या कामात समाधान ......... 

        आयुष्यात काहीतरी मोठं करावं हि जवळपास प्रत्येकाचीच ईच्छा असते परंतु बऱ्याच जणांना ती पूर्ण  करता येत नाही. ती का पूर्ण झाली नाही ह्यासाठी प्रत्येकाकडे  वेगवेगळी कारणे असू शकतात , काही नशिबाला दोष देत बसतात तर काही परस्थिती ला.जसा ज्याचा  दृष्टीकोन तस त्याच उत्तर मिळणार ह्ये निश्चितचं.तुम्ही काय बनणार होते ह्यापेक्षा  तुम्ही आज काय आहात ह्याला  जगात जास्त महत्व आहे.बऱ्याच लोकांना आपण ह्ये बनू शकलो नाही ते बनू शकलो  नाही याची खंत असते ,जगातील जवळपास ९० टक्के लोकांना हि खंत असतेच यात काही नवल नाहीच परंतु काहीजण  हि खंत मनात घेऊनच मरतात. हो निराश  होऊन आत्महत्या सुद्धा करतात , अलीकडेच तशी बरीच उदाहरणे आहेत. परंतु जगात अशी बरीच  माणसं आहेत ज्यांनी आहे त्या परिस्थितीत स्वतःचे विश्व बदलले आहे आणी हो विश्वालाही .
         परिस्थिती बदलण्याची क्षमता सृष्टीच्या निर्मात्याने सर्वानांच  दिली आहे परंतु त्याची जाणीव हि ज्याची त्यालाच होते..... किंबहुना ती करून घ्यावी लागते. असो ,आहे त्या पदावर ,त्या कामावर जे आपण मिळवले  आहे किंवा जे मिळाले आहे त्यात चांगलं काय करता येईल ह्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. चांगलं वाईट करण्याची संधी आयुष्यात सर्वांना मिळते परंतु मिळालेल्या संधीचं  सोनं वेळीच करता आले पाहिजे.त्यासाठी जिद्द आणी चिकाटी खूप महत्वाची आहे.कोणतेही काम लहान किंवा मोठं नसतं ,ते आपल्या करण्यावर अवलंबून असतं.कुठल्याही  कामात पूर्ण कौशल्य  प्राप्त करणे अवघड वाटत असले तरी अशक्य नाही हे लक्ष्यात ठेवले पाहिजे .काम मन लावून केले की त्यातील इंटरेस्ट वाढतो,आणी इंटरेस्ट वाढला की कौशल्ये  विकसित होतात ,कामातूनच मनुष्याला अनुभव येतो .त्यामुळे आधी आहे त्या कामात योग्य प्रकारे लक्ष घाला म्हणजे गोडी निर्माण होईल .

स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा......... 

        किरण बेदी,टी एन शेषन ,गोरा खैरनार ,विश्वास नागरे पाटील ,तुकाराम मुंडे अशी बरीच नावे आपण ऐकली असतील.कोण हि माणसं;आईपीएस,आयएएस अधिकारी बरेच झालेत आणि होतही आहेत.परंतु यांची  जनमानसात काही विशेष ओळख आहे,कश्यामुळे तर त्यांचा कामामुळेच.त्यामुळे मित्रानो काम अश्याप्रकारे करा की ,कामामुळे  तुमची स्वतःची वेगळी ओळख निर्माण होईल.आहे ते काम करताना पुढे जाण्यासाठी प्रयत्न हि करू शकताच की.






Comments